सायकली काढून सगळेच टांग टाकून हॉस्टेलकडे. गप्पा नेहमीच्याच; मॅडमच्या कॉमेंट्स आणि पुढच्या आठवड्यात करायच्या असाईनमेंट्स. काय करायचे, कोणी करायचे याचा थांग नसतो.
बाकीचे डीपार्टमेंट्सचे विद्यार्थी तोपर्यंत बाहेर पडलेले असतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या कलरचा ड्रेस घालून आलेला असतो. ड्रेसचे रंग, डीझाईन्स यामुळे डोळे सुखावतात; काय पण मनुष्याचा चमत्कार आहे!!! विचारांचे घोडे या दोन विषयांच्या पुढे जातच नाहीत.
ढग दाटून आलेले असतात, अंधार पडायच्या बेतात असतो. पावसाचे चिन्हही कधी दिसत नाही, अंगाची आणि जीवाची काहिली मात्र नेहमीचीच. बाजूनेच एखादी गाडी जाते. कुठल्यातरी प्रोफेसरचीच असणार, नाहीतर इथे कोणत्या स्टुडंटकडे फोर व्हीलर येणार? तंद्रीतच सायकल चालवत असतो. तरीपण कुणाचाही अपघात वगैरे होत नाही
नाश्ता करुन परत खुराडेवजा खोलीत परत. लॅपटॉप चालू करुन तोंड खुपसुन बसतो. एका छोट्या खिडकीतून मोठ्ठे जग माझ्या डोळ्यांनी बघत असतो.
अरे वा मस्तच :)
उत्तर द्याहटवाअरे पण तोच लॅपटॉप तुझा एकतेपणा घालवतो ना?
मस्त जमलाय पण लेख ...
good going keep it up :)
सुंदर! छान मनस्वी लेख.
उत्तर द्याहटवाAre mast lihilays...
उत्तर द्याहटवाzakkas
आई गं.. भारी जमलाय की रे.. but believe me, enjoy this. हे सगळ पुन्हा येणार नाही इसकी guarantee है.
उत्तर द्याहटवाmast ree....90% students cha hach dinkram aasto ithe...
उत्तर द्याहटवा:-) jamalay datar shastri ....."एका छोट्या खिडकीतून मोठ्ठे जग माझ्या डोळ्यांनी बघत असतो." khare ahe bagh agadi ... aapan sagalech chhotya khidakitun mothhe jag aani tya mothhya jagat asanyachi chhotishi ka hoina asha balagunch asato ... aani kadachit yachmule ayushya jaganyachi urmi milate.... lihit raha anirudha
उत्तर द्याहटवाha aahe buva he sagle khare..asech aste saglya thikani....gharogharii matichyach chuli astat...jra aani vistarane vichar kelas tar navin jag sapdel bagh lihayla...
उत्तर द्याहटवाtuzya shevatchya vakyani mala ek prayogik natakatla prasang athavla..natkache nav "khidkya"
उत्तर द्याहटवाha khidkya shabd ha natavane aajila computer shikavtana "Windows" hyala samanarthi marathi shabda mhanun vaparla ahe...tya prasangat aaji natvala mhanate..." are tu ha computer anun dilas he barr kelas..nidan mala bakiche mhatare je jag andharya kholitlya khidkyatun baghatat tya peksha vegale jag bhagayla milata.."
lekh changla ahe.
धन्यवाद केदार. पण मी जेंव्हा लेख लिहिला, तेंव्हा त्या नाटकाचा विचारही माझ्या डोक्यात नव्हता. या नाटकाबद्दल ऐकले आहे बरेच काही. एकदा बघायाचेय एकदा.
उत्तर द्याहटवा